Wednesday, 1 May 2019

*मी महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्र माझा* 🚩🇮🇳 जयहिंद मित्रांनो जयहिंद, आज ०१ मे अर्थात महाराष्ट्र दिन , या दिवसाची महती, महत्व आणि माहिती आपल्या सर्वांना असणारच यात दुमत नाही.... या महा - राष्ट्रच्या निर्मिती साठी अनेकांनी आपले प्राण वाहिले आणि या महान अर्थात महा राष्ट्राची निर्मिती झाली.... आणि पुढे अनेकांनी या महाराष्ट्राला महान करण्यासाठी आपले आयुष्य वेचले, कोणी आबाद होऊन तर कोणी नाबाद राहून आपल्या महाराष्ट्रला घडवलं आणि देशातच नव्हे तर जगात एक वेगळी ओळख निर्माण करून दिली आहे. मित्रांनो ईतिहास साक्षी आहे, देशाच्या प्रतिकूल परिस्तिथी मध्ये देशाला दिशा देण्याचं काम हे, एक पाऊल पुढे टाकत, या महाराष्ट्राने नेहमीचं केलं होत, आज हि करत आहे, आणि उद्या हि करत राहणार आहे... *कारण हा महाराष्ट्र आहे कणखर मनांचा, निधड्या छातीचा, आणि शूर वीरांचा...*. आज देखील या अखंड महाराष्ट्राच्याचं नव्हे तर अजिंक्य भारतासाठी महाराष्ट्रतून आपले अनेक शूर मावळे भारतीय संरक्षण दलात, आपल्या जीवाची पर्वा न करता आपली बहादुरी आणि शूरगिरी गाजवत आहेत...अशा या शूर, बहादूर आणि जिगरबाज सैनिकांना आजच्या महाराष्ट्र दिनी, जयहिंद फाऊंडेशनचा मानाचा मुजरा.... *मित्रांनो आपल्या या महा-राष्ट्रातील अशाच १४ जवानांनी आपल्या जीवाची तर सोडाच पण त्यांच्यावर ज्यांचा जीव आहे ते माता पिता, धर्मपत्नी आणि ती छकुली आणि छकुला यांचा देखील विचार न करता आपल्या प्राणांचे बलिदान दिले त्या १४ हुतात्मा जवानांच्या कुटुंबाचा सन्मान सोहळा रविवार दिनांक ०५ मे २०१९ रोजी सकाळी ९ वाजता , वासुदेव बळवंत फडके सभागृह, पनवेल येथे आयोजित केला आहे....* *तेव्हा मित्रांनो या खऱ्या खुऱ्या बाजीगारांच्या कर्तृत्वाची आणि आपल्या देशाच्या खऱ्या हिरोंच्या बलिदानाची,त्यागाची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, तमाम महाराष्ट्र वासीयांना आजच्या या पवित्र महाराष्ट्र दिनी जयहिंद फाऊंडेशन आपल्याला आग्रहाचे निमंत्रण देत आहे. आणि आपण सगळे नक्की येणार आहात कारण हा महाराष्ट्र माझा आहे आणि मी या महाराष्ट्राचा आहे आणि म्हणूनच मी, तुम्ही आणि आपण सर्व एका सुरात सूर मिळऊन म्हणणार आहोत.* *जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा.* जयहिंद फाऊंडेशन, महाराष्ट्र राज्य, (सैनिक हो तुमच्यासाठी) अध्यक्ष वर्धा जिल्हा बिपीन मोघे 9421726268

Wednesday, 17 April 2019

सैनिक हो तुमच्या साठी।

*फक्त जयहिंद बोललं म्हणजे झालं का* ? 🇮🇳

जयहिंद मित्रांनो जयहिंद,
मित्रांनो किती साधा आणि सोपा शब्द आहे हा बोलायला, आपण सहज बोलतो जयहिंद, जे लोक जयहिंद बोलत नाहीत त्यांच्या विषयी काही बोलायचे नाही.परंतु जे जयहिंद बोलतात त्यांच्याशी थोडं हितगुज.
मित्रांनो जयहिंद या शब्दाची फोड केली तर जय आणि हिंद अशी होईल, म्हणजेच आपल्या देशाचा विजय आहे किंवा असो. आपण सर्वजण या देशाचे सुजाण नागरीक आहोत, ज्या मातृ-भूमीतआम्ही जन्म घेतला, आणि शिक्षणाला सुरवात केली तेव्हा पासूनच आपण प्रतिज्ञा घेतो कि भारत माझा देश आहे,या देशातील सारे भारतीय माझे बंधू आणि भगिनी आहेत आणि या देशावर माझे प्रेम आहे.

मित्रांनो ज्या देशात आपण राहतो तो देश आपलाच आहे, यात दुमत नाही, परंतु सारे भारतीय आपले बंधू आहेत भगिनी आहेत का ? हा प्रश्न आपण एकदा प्रामाणिक पणे स्वतःला विचारणे गरजेचे आहे. आज आपल्याला फक्त आपल्या सैनिक बांधवाच्या विषयीचं बोलायाचं आहे. आज आपण सगळेच सोशल माध्यमातून एक दुसऱ्यांशी सतत संपर्कात असतो. त्यामुळे देशाच्या सीमेवर आपले सैनिक बांधव कसे आहेत किंवा ते कशा प्रतिकूल परिस्तीथीशी सामना करत आपल्या देशाचे आणि आपले संरक्षण करत आहेत हे आपल्याला समजत असतं. अगदी तसेच जर शत्रूने हल्ला केला तर तो परतवण्यासाठी आपल्या जीवाची
बाजी लावून शत्रूशी लढता लढता प्रसंगी शहीद झालेल्या आपल्या बांधवांच्या बाबतीत देखील आपल्याला लगेच समजत असतं. अशी दुःखाची बातमी समजलीरे समजली  की एक भारतीय नागरिक म्हणून आपण सगळे सर्वप्रथम काय करतो तर, सोशल माध्यमातून "भावपूर्ण श्रध्दांजली" हे दोन शब्द लिहिले आणि पुढे पाठवले की एक भारतीय नागरिक म्हणून आपल्या सैनिक बांधवा बद्दलची आपली जबाबदारीची बांधिलकी संपवतो.

मित्रांनो थोडा विचार करा, आपल्या या दोन शब्दात संपेल एवढचं त्या आपल्या सैनिकांच्या बलीदानाच योगदान आहे का ? तर नक्कीच नाही.मित्रांनो आपण सगळेच आप आपल्या क्षेत्रात, कामात व्यस्त आहात आणि असायला ही हवं कारण आपल्या कुटुंबाची जबाबदारी आपल्या खांद्यावर आहे, अगदी तसंच आपल्या देशाच्या रक्षणाच्या जबाबदारीसाठी खांद्यावर बंदूक घेऊन आपले सैनिक बांधव सीमेवर २४ तास अविरत पहारा देत आहेत म्हणून आपण इथे आपल्या कुटुंबा बरोबर आनंदात राहतो आहोत. परंतु या देश रक्षणा करता प्रसंगी शहिद झालेल्या आपल्या सैनिक बांधवाच्या;कुटुंबाच्या आनंदाच काय ? हा प्रश्न आपल्याला पडतो का ? आणि जर पडला तर आपण तो सोडवतो का ?

मित्रांनो नुकताच आनंदाचा दिवाळी सण संपला आपण प्रत्येकाने तो आपल्या कुटुंबाबरोबर मोठ्या आनंदाने साजरा केला, कुणी कुटुंबा  बरोबर मित्र परिवाराबरोबर सहलींचा आनंद घेतला , कुणी सिनेमांचा आनंद घेतला, कुणी पै पाहुण्यांचा भेटीचा आनंद घेतला तर कुणी देव दर्शनाचा आनंद घेतला तर कुणी दिवाळी सुट्टीत आरामाचा आनंद घेतला. मित्रांनो याचं दिवाळी सणा दरम्यान
हिंदी चित्रपट सृष्टीतील सामाजिक भान असणारा कलाकार अक्षय कुमार याने आपल्या दिवाळीच्या सणाचा आनंद हा शहीद झालेल्या कुटुंबाना आर्थिक मदत देऊन साजरा केला. ही बातमी आपण सर्वांनी सोशल माध्यमातून एक दुसऱ्यांना पाठवली, परंतु पुढे पाठवण्याच्या अगोदर आपल्या मनात विचार आला का ? अरे अक्षय कुमार जर हे करतो आहे तर मग आपण देखील थोडा तरी खारीचा वाटा का बरं उचलू नये ?

परंतु तसं न होता ती बातमी सोशल माध्यमातून फक्त पुढे पाठवली, म्हणजे मी माझे देशप्रेम आणि देशभक्ती सिद्ध केली, आणि आपली आपल्या सैनिक बांधवाच्या कुटुंबाप्रती असलेली नैतिक आणि राष्ट्रीय जबाबदारी संपली. आहो अक्षय कुमार, नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे हि आणि असे अनेक लोकं हे आपल्या शहीद सैनीक कुटुंबासाठी, समाजासाठी, देशासाठी खूप काही करत आहेत,
त्यांनी केलेल्या देश भक्तीच्या, देश सेवेच्या बातम्या फक्त सोशल माध्यमातून पुढे पाठवताना आपल्याला देखील आपल्या सामाजिक जबाबदारीची,सामाजिक बांधिलकीची जाणीव व्हायला हवी नाही का ? वि. दा. करंदीकर यांचा एक सुंदर विचार इथे मुद्दाम सांगावासा वाटतो, देणाऱ्याने देतं जावे, घेणाऱ्याने घेतं जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. तर मित्रांनो चला आपण अक्षय कुमार, नाना पाटेकर यांचे आणि त्यांच्या सारख्या अनेक सामाजिक संस्थेचे जे सैनिकांसाठी जे कार्य चालू आहे त्याचा एक भाग होऊ या आणि आपलं राष्ट्रीय कर्तव्य पार पडू या.       

मित्रांनो हा पत्र प्रपंच हा एवढ्याच साठी की हा देश, ही भारत भुमी माझी आहे आणि या भुमीच रक्षण करणारा माझा रक्ताचा नसला तरी माझा बांधव आहे,त्याचा त्याग हा देशासाठीचा सर्वोच्च त्याग आहे, त्याच्या पाठी मागे त्याच्या कुटुंबाची जबाबदारी माझी देखील आहे, याची जाणीव व्हायला हवी.तेव्हा मित्रांनो फक्त जयहिंद बोलून जमणार नाही, फक्त श्रध्दांजली वाहून जमणार नाही, तर या जयहिंद साठी लढणाऱ्या कुटुंबाच्यामागे खंभीर उभं राहिलं पाहिजे, हो ना ? आता ते कसं उभं राहायचं हे आपण ठरवायचं आहे.बाकी आपण ज्ञाते आणि सर्वश्रुत आहातच.

लक्षात ठेवा देहाकडून देवाकडे जाताना जो देश लागतो, ज्या देशात मी राहतो, ज्या देशाचं मी काहीतरी देणं लागतो, ज्या देशावर प्रेम आहे. त्या साठी नुसत जयहिंद बोलुन चालणार नाही तर आपल्या कृतीतुन पण दीसुन आले पाहीजे.

जयहिंद,
भारत माता कि जय,

जयहिंद फौंडेशन।
(सैनिक हो तुमच्यासाठी)

अध्यक्ष
जयहिंद फाउंडेशन,
शाखा वर्धा
: श्री बिपीन मोघे
9421726268/ 7350278141

Saturday, 9 March 2019

मेरा देश सर्व प्रथम

हम तो आज मे जिते है। और जो गलत है ऊसे गलत ही कहते है। क्योकी हम खुद्द को मानते है। किसीं और का थोपा हुवा नही। जीस दिन मोदी की बातें हमे बुरी लगे ऊस दिन हम आप से सला लेणे नही , खुद्द का निर्णय लेंगे। क्योनकी हमारे दिल मे कोई एक धर्म, या पंथ, या पक्ष, या पार्टी नही बसती और नाही हमे इसकी कभी जरूरत पढी है। और नाही पढेगी क्योनकी हमारे दिल मे देश बसता है। धर्म नही। धर्म का प्रचार या धर्म की राजनीती की जरूरत उन्हे होती है। जिन्हे उनके धर्म मे कमी नजर आती हो और प्रचार करणा उनकी मजबुरी समजते है। हम तो सभी धर्म को मानते है। इस लीये हमे इसकी जरूरत नही होती।
।।जयहिंद।।
।।जय भारत।।
बिपीन मोघे
(एक सैनिक)

Tuesday, 19 February 2019

श्रद्धांजली

सुधा_मूर्ती_यांचा निशब्द करणारा एक लेख....
*नक्की वाचा, नक्कीच  काही तरी नवीन शिकायला मिळेल.*

त्या रशिया मध्ये असताना एका पार्क मध्ये फिरायला गेल्या होत्या. रविवार.. त्यात थोडा पाऊस आणि थंडी.. नुकतेच लग्न झालेले एक जोडपे तिथे फोटो काढून घेत होते. ब्लाँड, घाऱ्या निळ्या डोळ्यांची पंचविशीतली सुंदर मुलगी आणि तिच्याच वयाचा तितकाच हँडसम मुलगा.. मुलीने अतिशय देखणा व्हाइट वेडिंग गाऊन घातला होता पण मुलाने मात्र मिलिटरी युनिफॉर्म..

त्यांचे फोटो काढून झाल्यावर तिथेच असलेल्या वॉर मेमोरिअल पाशी ते गेले आणि हातातला बुके तिथे ठेऊन दोघांनी मान झुकवून वंदन केले. हे सगळे पहात असलेल्या सुधा मूर्तींच्या मनात अनेक प्रश्नांनी गर्दी केली होती.. तितक्यात तिथेच बाजूला उभ्या असलेल्या एका वयस्कर माणसाने त्यांची साडी पाहून विचारले "तुम्ही भारतिय का?" हो असे उत्तर देऊन त्यांच्या गप्पांना सुरुवात झाली. त्या माणसाने परदेशात काम केले असल्याने इंग्लिश मध्ये बोलणे सोप्पे झाले. जरा उत्सुकतेने मूर्तींनी विचारले हे दोघे इथे येऊन नमस्कार का करून गेले? त्यावर त्या माणसाने सांगितले "रशिया मधे लग्न झाल्यावर त्या जोडप्याने कोणत्याही एका राष्ट्रीय स्मारकाला भेट द्यायची पद्धत आहे. नवरा मुलगा लग्नात केवळ मिलिटरी युनिफॉर्मच घालतो. प्रत्येक तरुण मुलाला (समाजातील सगळया स्तरातल्या) काही वर्षे आर्मी जॉईन करावी लागते. तरुण पिढीला हे लक्षात राहावे की आपल्या आधीच्या पिढीने त्यांचे आयुष्य देशासाठी अर्पण केले, रशियने अनेक लढाया लढल्या, त्यातल्या काही जिंकल्या, काही हरल्या पण जे युद्धात मारले गेले त्यांचा त्याग विसरला गेला नाही पाहिजे. नवीन लग्न झालेल्या जोडप्यांच्या हे कायम लक्षात राहिले पाहिजे की ते ज्या स्वतंत्र, शांततापूर्ण रशिया मध्ये रहात आहेत ही या युद्धात शहीद झालेल्यांची देण आहे. आणि त्यांनी त्यांच्या आयुष्यातल्या सगळ्यात आनंदाच्या क्षणी या शहिदांना विसरता कामा नये.. त्यांच्या पुढच्या पिढीला सुद्धा याची जाणीव त्यांनी करून दिली पाहिजे.. देशाप्रती प्रेम हे लग्नाच्या सेलिब्रेशन पेक्षा जास्त महत्त्वाचे आहे.. "

किती मोठा विचार आहे हा.. आपल्या डोक्यात का नाही येत या गोष्टी?? का नाही थोडीही कृतज्ञता दाखवत आपण आपल्या जवानां साठी?? का आपल्या विचारांमधे, कृतींमध्ये यांचे समर्पण नसते?? भारत इंग्रजांच्या तावडीतून स्वतंत्र झाला हे सोडून आणि इतिहासातले धडे सोडले तर आजच्या नवीन पिढीला किती क्रांतिकारकांची नावे माहित आहेत?? आपल्या पाल्याला हे सगळे माहित पाहिजे, त्याच्या मनात देशाविषयी, आपल्या सैन्याविषयी प्रेम, आदर हा असलाच पाहिजे आणि त्यासाठी पोषक वातावरण देणे ही किती पालकांना त्यांची जबाबदारी वाटते?? किती शाळांमध्ये इतिहास हा नवीन  सक्षम पिढी घडवण्यासाठी शिकवला जातो??

सीमेवर हल्ले तर होतच राहतात, आपले जवान शहीद होतच राहतात म्हणून आपण सोयीस्कर पणे दुर्लक्ष करत रहाणार.. चर्चा, महाचर्चा घडत रहाणार, अपोझिशन वाले आणि सत्तेत असणारे एसी ऑफिस मध्ये बसून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यातच धन्यता मानणार, शहिदांच्या कुटुंबीयांना निधी जाहीर होणार, दोन चार नेते त्यांना भेटणार त्याचे फोटो पेपर मध्ये छापुन येणार आणि आपण चोवीस तासांच्या आत सगळे विसरून जाणार..

सो कॉल्ड वॅलेंटांईंस डे साजरा करून झाल्यावर आता आजही शहीद झालेल्या आपल्या जवानांना कोरडी श्रद्धांजली वाहण्यापलिकडे आपण करणार तरी काय आहोत अजून..??!!

।।जयहिंद।।

Monday, 17 December 2018

शहिदांच्या शौर्याचे दीप उजळू दे।

               ।।सैनिक शौर्याचे दीप उजळू दे।।
भारतीय सैनिकांच्या 1971 च्या भारत पाकिस्तान युद्ध आणि त्या युद्धा ची शौर्याची गाथा खरंतर प्रत्येक भारतीयाच्या हृदयात कोरली जायला हवी अशी आहे. अभूतपूर्व साहस, जाज्ज्वल्य देशाभिमान, दुर्दम्य इच्छाशक्ती, नि:सीम धैर्य आणि कठोर निर्धार यांच्या बळावर एकीकडे अपुरा शस्त्रसाठा, प्रतिकूल निसर्ग आणि दुसरीकडे अत्यंत आव्हानात्मक परिस्थिती असताना त्यांवर मात करत, आपल्या जिवाची तमा न बाळगता 'छोडो मत उनको!' असं म्हणत शरीरातल्या रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढणारे भारतीय सैन्याचे वीर जवान! पण कित्येकांना या तेजाच्या स्फुल्लिंगांचा विसर पडला आहे आणि त्याच जोडीला आजच्या तरुण रक्ताला योग्य दिशा नाही, आदर्श नाहीत म्हणून ओरड होताना ऐकू येत आहे. आजच्या तरुणाईपुढे  शूरवीर जवानांच्या अपार शौर्याची कहाणी मांडताना अतिशय दुःख वाटते.
            मित्रांनो अशीच परिस्थिती वर्धा जिल्यातील शहीद शंकर पंढरीनाथ मानकर (सेना क्रमांक.४५४१०७५) या सैनिकाचा जन्म वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यातील यशोदा नदीच्या काठावरील मुरदगाव(बेलसरे) येथे दिनांक 11फेब्रुवारी 1951 साली माता मीराबाई या वीर मातेच्या पोटी झाला. त्यांना लहान पणा पासूनच देशसेवेचे आणि सैन्य सेवेचे आकर्षण असल्याने ऐन तारुण्यात, वयाची 18 वर्ष पूर्ण होताच सन 1969 मध्ये वर्धा येथून सैन्य भरती प्रक्रिया पूर्ण करून सागर येथे सैन्य प्रशिक्षण घेण्यासाठी दाखल झाले. हे प्रशिक्षण पूर्ण होताच त्यांची प्रथम नियुक्ती फर्स्ट महार रेजिमेंट मध्ये झाली . यावेळी ही तुकडी भारताच्या उत्तर भागात जम्मू काश्मीर मध्ये होती.
            एक वर्षाच्या पश्चात ते लग्नाचा विचार करून रजेवर आले , देवळी येथील मुलगी पहिली राजा संपल्यामुळे पुढील सुट्टीत लग्न करू या हेतूने पुन्हा आपल्या कर्तव्यावर रुजू झाले. या दरम्यान पाकिस्थान सोबत युद्धा चे रणशिंग पुकारण्यात आले आणि ते आपल्या तुकडी सह राजुरी पुच्छ हरारे कलानयुद्ध क्षेत्र छाम्ब सेक्टर जम्मू काश्मीर येते युद्धा साठी सज्य झाले. आणि ऐन तारुण्याच्या उंबरठ्यावर असतांना त्यांना शत्रूशी लढा देत त्यांना दिनांक 10 डिसेंबर 1971 रोजी वयाच्या 20 व्या वर्षी वीरमरण प्राप्त झाले. आणि शहीद शंकर मानकर यांचे अस्थी व दैनंदिन जीवनातील वापरण्यात येणारी कपडे व वस्तू समेत त्यांच्या घरच्यांना सुपूर्द करण्यात आले.
                मित्रांनो सर्वात मोठी शोकांतिका आहे की देशासाठी आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या शूरवीर सैनिकांचा 40 वर्ष त्याच्या मातृभूमीला , या जिल्ह्याला विसर पडला आणि शेवटी 40 वर्षा नंतर या शाहिद सैनिकाचे काका जे स्वतः सैन्य सेवेतून सुभेदार या पदावरून सेवा निवृत्त आहे श्री रामदासजी मानकर यांच्या  पुढाकाराने शहीद शंकर पंढरीनाथ जी मानकर शहीद स्मारक समिती स्थापन करण्यात आली. आणि 5 वर्ष या समितीने शासना कडे पाठ पुरावा केला आपले पाय रगडले आशा परिस्थितीत ग्रामपंचायत कडून फक्त 30 बाय30 फूट जागा उपलब्ध करून दिली. परंतु ती सुद्धा कागदोपत्री पूर्ण झाल्याचे दिसून येत नाही.
                  खेद वाटतो की गावातील जेष्ठ नागरिक, शैक्षणिक,राजकीय,धार्मिक,सामाजिक,चळवळीत काम करणाऱ्या व्यक्तीला सुद्धा शहिदांच्या शौर्याचा विसर पडला. गावामध्ये शाळा, मंदिर,स्तूप,पुतळे, बांधण्यात आले परंतु शहीद स्मारक बांधावे,किंवा प्रमुख रस्त्याला शाहिदाचे नाव देऊन त्यांच्या स्मूती जागृत ठेवाव्यात असा कुणाच्याही मनात विचार सुद्धा आला नाही.
                अश्या परिस्थितीत शेवटी माजीसैनिक श्री रामदासजी मानकर यांनी आर्थिक पुढाकार म्हणून 40 हजार रुपये आणि भारतीय माजीसैनिक संघ जिल्हा वर्धा यांच्या पुढाकाराने तसेच शाहिद स्मारक समितीच्या मदतीने 45 वर्षा नंतर 10 डिसेंबर 2016 रोजी शहीद शंकर मानकर यांच्या स्मारकाचे अनावरण करण्यात आले. परंतु त्या नंतर कुणीही लक्ष दिले नाही आणि परत शहीद दिवस सुद्धा साजरा करण्यात आला नाही ही गावकऱ्यांन साठी तसेच प्रशासना साठी मोठी लाजिरवाणी बाब आहे. एवढेच नाही तर या शाहिद सैनिकाची नोंद सुद्धा अध्यप पर्यंत आपल्या जिल्ह्याच्या जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या शहिदांच्या यादीत नाही. ही शोकांतिका आहे.
                आणि शेवटी 10 डिसेंम्बर 2018 रोजी जयहिंद फाउंडेशन महाराष्ट्र राज्य शाखा वर्धा यांच्या पुढाकाराने शाहिद शंकर मानकर यांचा शाहिद दिवस त्यांचे परिजन, गावकरी, आणि जयहिंद फाउंडेशन यांनी मिळून हा दिवस मोठ्या थाटाने साजरा केला आणि या पुढेही जयहिंद फाउंडेशन प्रत्येक वर्षी हा दिवस साजरा करण्यासाठी कटिबद्ध आहे तसेच शासनाशी पूर्ण न्याय मिळे पर्यंत लढा देत राहील.
               मित्रांनो आपल्याला ठाऊक आहे आज ची परिस्थिती लक्षात घेता असे दिसते की प्रत्येक दिवशी देश रक्षण करतांना आपले सैनिक शाहिद होतात दोन दिवस खूप मोठमोठे होर्डिंग लावून खाली मोजता येत नाही एवढे फोटो लावून श्रध्दांजली वाहतात दोन दिवसात तेच होर्डिंग खाली पडून कुणी पाय खाली तुडवतात, तर कुणी आपल्या हॉटेल मध्ये ऊन, वारा, पाऊस येऊ नये म्हणून लटकवतात किंवा बेड खाली टाकून त्यावर झोप काढतात. आणि विसरून जातात. परंतु कुणी हा विचार करतो का की या पाश्चात्य त्या शहीद परिवारावर काय परिस्थिती येते? त्याचा परिवार कागदपत्रे तयार करण्यासाठी जेव्हा शासकीय कार्यालयात जाते तेव्हा त्याला कशी वणूक मिळते? त्याला शासनाचा निधी उपलब्ध होई पर्यंत तो परिवार कसा आपला उदरनिर्वाह करतो? त्याचे छोटे छोटे मुलांच्या शिक्षणासाठी कुठं कुठे चकरा मारतो? आपण आपल्या परिवारात प्रत्येक सन मोठ्या थाटात मनवतो तेव्हा तेव्हा त्या परिवारात त्या कर्त्याच्या त्या विरपत्नी च्या, वीरमाते च्या, त्याच्या मुलांच्या ,मानत किती उदासीनता असते याचा विचार आपण कधी करतांना दिसतो का?
              मग अश्या मोठं मोठ्या होर्डिंग मध्ये लागणार निधी विनाकारण खर्च करण्या पेक्षा त्या परिवाराला सदिच्छा भेट, किंवा मुलांचा शिक्षण खर्च किंवा त्याच्या परिवारात जाऊन सन उत्साह का साजरा करू नये?  जनेकरून त्या परिवाराला त्या सैनिकांची कमी खलणार नाही. तसेच शासन एवढ्या मोठं मोठे आर्थिक नियोजन करते तर शाहिद परिवारासाठी किंवा शाहिद स्मारकासाठी प्रत्येक ग्रामपंचायत ला वेगळा निधी का उपलब्ध करून देऊ शकत नाही? स्मारक असे धूळ खात का पडले असते?
या देशा साठी जो सैनिक शहीद झाला त्याच्या शहीद दिवसाचा विसर कसा पडू शकतो आपण आपल्या नेत्याचा वाढदिवस विसरत नाही, त्याच्या लग्नाचा दिवस विसरत नाही, जाती पातीवर, आरक्षणा साठी, वेतनवाढ मिळावी यासाठी, मोठ मोठे मोर्चे काढतो, एखादा मोठा नेता गावात यायचा असला तर मोठ मोठे रस्ते सजवतो मग एका शहिदांच्या शहीद दिवस साजरा करण्या साठी निधी कुठून आणायचे या बद्दल बैठका घेऊन तो कार्यक्रम रद्द करून बसतो. मोठी लाजिरवाणी बाब आहे.
          मित्रानो म्हणून मी स्वतः अध्यक्ष जयहिंद फाउंडेशन जिल्हा वर्धा या नात्याने सैनिकांप्रती असलेल्या आपल्या कर्तव्याची त्या समाजाला जाणीव तर करून देत आहेतच, शिवाय आपल्या मायेचा हात या लढवय्या सैनिकांच्या पाठीवर ठेवून त्यांच्याशी व त्यांच्या कुटुंबियांशी जिव्हाळ्याचे ऋणानुबंध निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहो. 

                                        बिपीन व. मोघे
                                             अध्यक्ष
                         जयहिंद फाउंडेशन महाराष्ट्र राज्य
                                     शाखा वर्धा जिल्हा
            मोबाईल नंबर 9421726268/ 7350278141


Saturday, 15 December 2018

परमवीर चक्र विजेत्यांची शौर्य गाथा

मित्रांनो मी ब्रिगेडियर अनिल तळवलकर (निवृत्त) सेना मेडल यांचे परमवीर चक्र विजेत्यांच्या शौर्यकथा हे पुस्तक वाचले त्यात त्यांनी परमवीर चक्र विजेत्यांच्या विरकथा शालेय अभ्यास क्रमात नाही. आणि शाळा संपल्यानंतर बहुसंख्य नागरिकांचा  इतिहासाशी संबंध येतच नहीं. त्यामुळे आपल्या सैन्यतील वीरानी केलेल्या अतुलनीय कामगिरी बद्दल आपल्या समाजाला काहीच माहिती नहीं. आपल्या समाजातील ही त्रुटि अंशात: का होईना दूर करने गरजेचे आहे. असे त्यांच्या मनोगतात लिहिले. आणि हे खरोखर सत्य आहे.
         यासाठी आपणाला एकत्रित येऊन हे कार्य करावे लागेल त्या साठी प्रत्येक शाळेत जाऊन विरांची विरगाता शाळकरी मुलांना समजवावि लागेल. त्यामुळे स्वतंत्रयप्राप्तिनंतरचा इतिहास या देशातील नविन पिढीच्या मनात घर करुन जाईल तेव्हा आपन खरे सैनिक आहो. आपन देशासाठी काय केले , हे या जगाला कळेल आणि यामुळे परमवीर चक्र विजेता लान्स नायक करम सिंग सारख्या वीर योध्याला ,त्याच्या कुटुंबाला न्याय मिळेल.
       मित्रांनो आपल्या देशात शोकांतिका आशी परमवीर चक्र विजेता लान्स नायक करम सिंग या महान योध्याच्या घरीची स्तिथि अतिशय बिकट आहे. त्यामुळे त्यांच्या 21 वर्ष्याच्या सतनामसिंग या नतवाने त्यांना मिळालेल्या भारताच्या सर्वोच्च शोर्यपदकाचा लिलाव करण्याचे ठरविले आहे. कारण मागील 50 वर्ष, पंजाब सरकार, तसेच केंद्र सरकारने परमवीर चक्र विजेत्या ना लागु असलेले उदाहरणार्थ पेट्रोल पंप, जमीन व इतर फायदे त्यांना दिले नाहीत. ही दुःखाचीच गोष्ट नव्हे तर पूर्ण देशाला काळीमा फासणारी गोष्ट आहे. तसेच हे उदाहरण कही एका सैनिकाच्या बबतीतील नहीं तर कितीतरी सैनिकाना आपल्या देशातील एकाच खुर्चीवर बसून पूर्ण जीवन व्यतीत करणाऱ्या बाबू लोकांनी खोटी नाटी नियम व कारणे दाखवून, त्यांनी अतिशय काष्ठाने मिळविलेल्या सोयी सुविधा नकरलेल्या आहेत.
   जय हिन्द ।
बिपिन मोघे
अध्यक्ष
जयहिंद फाउंडेशन महाराष्ट्र राज्य
शाखा वर्धा

The Foreign Contribution (Regulation) Amendment Bill

The Foreign Contribution (Regulation) Amendment Bill, 2026 introduces stricter government control over how non-governmental organizations (N...