Monday 17 December 2018

शहिदांच्या शौर्याचे दीप उजळू दे।

               ।।सैनिक शौर्याचे दीप उजळू दे।।
भारतीय सैनिकांच्या 1971 च्या भारत पाकिस्तान युद्ध आणि त्या युद्धा ची शौर्याची गाथा खरंतर प्रत्येक भारतीयाच्या हृदयात कोरली जायला हवी अशी आहे. अभूतपूर्व साहस, जाज्ज्वल्य देशाभिमान, दुर्दम्य इच्छाशक्ती, नि:सीम धैर्य आणि कठोर निर्धार यांच्या बळावर एकीकडे अपुरा शस्त्रसाठा, प्रतिकूल निसर्ग आणि दुसरीकडे अत्यंत आव्हानात्मक परिस्थिती असताना त्यांवर मात करत, आपल्या जिवाची तमा न बाळगता 'छोडो मत उनको!' असं म्हणत शरीरातल्या रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढणारे भारतीय सैन्याचे वीर जवान! पण कित्येकांना या तेजाच्या स्फुल्लिंगांचा विसर पडला आहे आणि त्याच जोडीला आजच्या तरुण रक्ताला योग्य दिशा नाही, आदर्श नाहीत म्हणून ओरड होताना ऐकू येत आहे. आजच्या तरुणाईपुढे  शूरवीर जवानांच्या अपार शौर्याची कहाणी मांडताना अतिशय दुःख वाटते.
            मित्रांनो अशीच परिस्थिती वर्धा जिल्यातील शहीद शंकर पंढरीनाथ मानकर (सेना क्रमांक.४५४१०७५) या सैनिकाचा जन्म वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यातील यशोदा नदीच्या काठावरील मुरदगाव(बेलसरे) येथे दिनांक 11फेब्रुवारी 1951 साली माता मीराबाई या वीर मातेच्या पोटी झाला. त्यांना लहान पणा पासूनच देशसेवेचे आणि सैन्य सेवेचे आकर्षण असल्याने ऐन तारुण्यात, वयाची 18 वर्ष पूर्ण होताच सन 1969 मध्ये वर्धा येथून सैन्य भरती प्रक्रिया पूर्ण करून सागर येथे सैन्य प्रशिक्षण घेण्यासाठी दाखल झाले. हे प्रशिक्षण पूर्ण होताच त्यांची प्रथम नियुक्ती फर्स्ट महार रेजिमेंट मध्ये झाली . यावेळी ही तुकडी भारताच्या उत्तर भागात जम्मू काश्मीर मध्ये होती.
            एक वर्षाच्या पश्चात ते लग्नाचा विचार करून रजेवर आले , देवळी येथील मुलगी पहिली राजा संपल्यामुळे पुढील सुट्टीत लग्न करू या हेतूने पुन्हा आपल्या कर्तव्यावर रुजू झाले. या दरम्यान पाकिस्थान सोबत युद्धा चे रणशिंग पुकारण्यात आले आणि ते आपल्या तुकडी सह राजुरी पुच्छ हरारे कलानयुद्ध क्षेत्र छाम्ब सेक्टर जम्मू काश्मीर येते युद्धा साठी सज्य झाले. आणि ऐन तारुण्याच्या उंबरठ्यावर असतांना त्यांना शत्रूशी लढा देत त्यांना दिनांक 10 डिसेंबर 1971 रोजी वयाच्या 20 व्या वर्षी वीरमरण प्राप्त झाले. आणि शहीद शंकर मानकर यांचे अस्थी व दैनंदिन जीवनातील वापरण्यात येणारी कपडे व वस्तू समेत त्यांच्या घरच्यांना सुपूर्द करण्यात आले.
                मित्रांनो सर्वात मोठी शोकांतिका आहे की देशासाठी आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या शूरवीर सैनिकांचा 40 वर्ष त्याच्या मातृभूमीला , या जिल्ह्याला विसर पडला आणि शेवटी 40 वर्षा नंतर या शाहिद सैनिकाचे काका जे स्वतः सैन्य सेवेतून सुभेदार या पदावरून सेवा निवृत्त आहे श्री रामदासजी मानकर यांच्या  पुढाकाराने शहीद शंकर पंढरीनाथ जी मानकर शहीद स्मारक समिती स्थापन करण्यात आली. आणि 5 वर्ष या समितीने शासना कडे पाठ पुरावा केला आपले पाय रगडले आशा परिस्थितीत ग्रामपंचायत कडून फक्त 30 बाय30 फूट जागा उपलब्ध करून दिली. परंतु ती सुद्धा कागदोपत्री पूर्ण झाल्याचे दिसून येत नाही.
                  खेद वाटतो की गावातील जेष्ठ नागरिक, शैक्षणिक,राजकीय,धार्मिक,सामाजिक,चळवळीत काम करणाऱ्या व्यक्तीला सुद्धा शहिदांच्या शौर्याचा विसर पडला. गावामध्ये शाळा, मंदिर,स्तूप,पुतळे, बांधण्यात आले परंतु शहीद स्मारक बांधावे,किंवा प्रमुख रस्त्याला शाहिदाचे नाव देऊन त्यांच्या स्मूती जागृत ठेवाव्यात असा कुणाच्याही मनात विचार सुद्धा आला नाही.
                अश्या परिस्थितीत शेवटी माजीसैनिक श्री रामदासजी मानकर यांनी आर्थिक पुढाकार म्हणून 40 हजार रुपये आणि भारतीय माजीसैनिक संघ जिल्हा वर्धा यांच्या पुढाकाराने तसेच शाहिद स्मारक समितीच्या मदतीने 45 वर्षा नंतर 10 डिसेंबर 2016 रोजी शहीद शंकर मानकर यांच्या स्मारकाचे अनावरण करण्यात आले. परंतु त्या नंतर कुणीही लक्ष दिले नाही आणि परत शहीद दिवस सुद्धा साजरा करण्यात आला नाही ही गावकऱ्यांन साठी तसेच प्रशासना साठी मोठी लाजिरवाणी बाब आहे. एवढेच नाही तर या शाहिद सैनिकाची नोंद सुद्धा अध्यप पर्यंत आपल्या जिल्ह्याच्या जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या शहिदांच्या यादीत नाही. ही शोकांतिका आहे.
                आणि शेवटी 10 डिसेंम्बर 2018 रोजी जयहिंद फाउंडेशन महाराष्ट्र राज्य शाखा वर्धा यांच्या पुढाकाराने शाहिद शंकर मानकर यांचा शाहिद दिवस त्यांचे परिजन, गावकरी, आणि जयहिंद फाउंडेशन यांनी मिळून हा दिवस मोठ्या थाटाने साजरा केला आणि या पुढेही जयहिंद फाउंडेशन प्रत्येक वर्षी हा दिवस साजरा करण्यासाठी कटिबद्ध आहे तसेच शासनाशी पूर्ण न्याय मिळे पर्यंत लढा देत राहील.
               मित्रांनो आपल्याला ठाऊक आहे आज ची परिस्थिती लक्षात घेता असे दिसते की प्रत्येक दिवशी देश रक्षण करतांना आपले सैनिक शाहिद होतात दोन दिवस खूप मोठमोठे होर्डिंग लावून खाली मोजता येत नाही एवढे फोटो लावून श्रध्दांजली वाहतात दोन दिवसात तेच होर्डिंग खाली पडून कुणी पाय खाली तुडवतात, तर कुणी आपल्या हॉटेल मध्ये ऊन, वारा, पाऊस येऊ नये म्हणून लटकवतात किंवा बेड खाली टाकून त्यावर झोप काढतात. आणि विसरून जातात. परंतु कुणी हा विचार करतो का की या पाश्चात्य त्या शहीद परिवारावर काय परिस्थिती येते? त्याचा परिवार कागदपत्रे तयार करण्यासाठी जेव्हा शासकीय कार्यालयात जाते तेव्हा त्याला कशी वणूक मिळते? त्याला शासनाचा निधी उपलब्ध होई पर्यंत तो परिवार कसा आपला उदरनिर्वाह करतो? त्याचे छोटे छोटे मुलांच्या शिक्षणासाठी कुठं कुठे चकरा मारतो? आपण आपल्या परिवारात प्रत्येक सन मोठ्या थाटात मनवतो तेव्हा तेव्हा त्या परिवारात त्या कर्त्याच्या त्या विरपत्नी च्या, वीरमाते च्या, त्याच्या मुलांच्या ,मानत किती उदासीनता असते याचा विचार आपण कधी करतांना दिसतो का?
              मग अश्या मोठं मोठ्या होर्डिंग मध्ये लागणार निधी विनाकारण खर्च करण्या पेक्षा त्या परिवाराला सदिच्छा भेट, किंवा मुलांचा शिक्षण खर्च किंवा त्याच्या परिवारात जाऊन सन उत्साह का साजरा करू नये?  जनेकरून त्या परिवाराला त्या सैनिकांची कमी खलणार नाही. तसेच शासन एवढ्या मोठं मोठे आर्थिक नियोजन करते तर शाहिद परिवारासाठी किंवा शाहिद स्मारकासाठी प्रत्येक ग्रामपंचायत ला वेगळा निधी का उपलब्ध करून देऊ शकत नाही? स्मारक असे धूळ खात का पडले असते?
या देशा साठी जो सैनिक शहीद झाला त्याच्या शहीद दिवसाचा विसर कसा पडू शकतो आपण आपल्या नेत्याचा वाढदिवस विसरत नाही, त्याच्या लग्नाचा दिवस विसरत नाही, जाती पातीवर, आरक्षणा साठी, वेतनवाढ मिळावी यासाठी, मोठ मोठे मोर्चे काढतो, एखादा मोठा नेता गावात यायचा असला तर मोठ मोठे रस्ते सजवतो मग एका शहिदांच्या शहीद दिवस साजरा करण्या साठी निधी कुठून आणायचे या बद्दल बैठका घेऊन तो कार्यक्रम रद्द करून बसतो. मोठी लाजिरवाणी बाब आहे.
          मित्रानो म्हणून मी स्वतः अध्यक्ष जयहिंद फाउंडेशन जिल्हा वर्धा या नात्याने सैनिकांप्रती असलेल्या आपल्या कर्तव्याची त्या समाजाला जाणीव तर करून देत आहेतच, शिवाय आपल्या मायेचा हात या लढवय्या सैनिकांच्या पाठीवर ठेवून त्यांच्याशी व त्यांच्या कुटुंबियांशी जिव्हाळ्याचे ऋणानुबंध निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहो. 

                                        बिपीन व. मोघे
                                             अध्यक्ष
                         जयहिंद फाउंडेशन महाराष्ट्र राज्य
                                     शाखा वर्धा जिल्हा
            मोबाईल नंबर 9421726268/ 7350278141


Saturday 15 December 2018

परमवीर चक्र विजेत्यांची शौर्य गाथा

मित्रांनो मी ब्रिगेडियर अनिल तळवलकर (निवृत्त) सेना मेडल यांचे परमवीर चक्र विजेत्यांच्या शौर्यकथा हे पुस्तक वाचले त्यात त्यांनी परमवीर चक्र विजेत्यांच्या विरकथा शालेय अभ्यास क्रमात नाही. आणि शाळा संपल्यानंतर बहुसंख्य नागरिकांचा  इतिहासाशी संबंध येतच नहीं. त्यामुळे आपल्या सैन्यतील वीरानी केलेल्या अतुलनीय कामगिरी बद्दल आपल्या समाजाला काहीच माहिती नहीं. आपल्या समाजातील ही त्रुटि अंशात: का होईना दूर करने गरजेचे आहे. असे त्यांच्या मनोगतात लिहिले. आणि हे खरोखर सत्य आहे.
         यासाठी आपणाला एकत्रित येऊन हे कार्य करावे लागेल त्या साठी प्रत्येक शाळेत जाऊन विरांची विरगाता शाळकरी मुलांना समजवावि लागेल. त्यामुळे स्वतंत्रयप्राप्तिनंतरचा इतिहास या देशातील नविन पिढीच्या मनात घर करुन जाईल तेव्हा आपन खरे सैनिक आहो. आपन देशासाठी काय केले , हे या जगाला कळेल आणि यामुळे परमवीर चक्र विजेता लान्स नायक करम सिंग सारख्या वीर योध्याला ,त्याच्या कुटुंबाला न्याय मिळेल.
       मित्रांनो आपल्या देशात शोकांतिका आशी परमवीर चक्र विजेता लान्स नायक करम सिंग या महान योध्याच्या घरीची स्तिथि अतिशय बिकट आहे. त्यामुळे त्यांच्या 21 वर्ष्याच्या सतनामसिंग या नतवाने त्यांना मिळालेल्या भारताच्या सर्वोच्च शोर्यपदकाचा लिलाव करण्याचे ठरविले आहे. कारण मागील 50 वर्ष, पंजाब सरकार, तसेच केंद्र सरकारने परमवीर चक्र विजेत्या ना लागु असलेले उदाहरणार्थ पेट्रोल पंप, जमीन व इतर फायदे त्यांना दिले नाहीत. ही दुःखाचीच गोष्ट नव्हे तर पूर्ण देशाला काळीमा फासणारी गोष्ट आहे. तसेच हे उदाहरण कही एका सैनिकाच्या बबतीतील नहीं तर कितीतरी सैनिकाना आपल्या देशातील एकाच खुर्चीवर बसून पूर्ण जीवन व्यतीत करणाऱ्या बाबू लोकांनी खोटी नाटी नियम व कारणे दाखवून, त्यांनी अतिशय काष्ठाने मिळविलेल्या सोयी सुविधा नकरलेल्या आहेत.
   जय हिन्द ।
बिपिन मोघे
अध्यक्ष
जयहिंद फाउंडेशन महाराष्ट्र राज्य
शाखा वर्धा

डॉ. पांडुरंग सदाशिव खानखोजे

स्मरण : एक प्रेरणादायी प्रवास डॉ. पांडुरंग सदाशिव खानखोजे यांचे सारे आयुष्यच विस्मयकारी घटनांनी भरलेले आहे. गदर क्रांतीचे प्रणेत...