Bipin Moghe blogs
Nrar Marutibhau Samadhi, Mehar Nagar, Shindhi (Meghe) Wardha At, Post, Thl, Dist;- Wardha , Pin-442001 MAHARASHTRA
Saturday, 8 August 2026
The Foreign Contribution (Regulation) Amendment Bill
Wednesday, 5 August 2026
सिपाही बबलू सिंह सेना मेडल (मरणोपरांत)
Saturday, 4 July 2026
आत्मविश्वास
Monday, 1 July 2024
फक्त जयहिंद बोललं म्हणजे झाले का?
जयहिंद मित्रांनो जयहिंद,
मित्रांनो किती साधा आणि सोपा शब्द आहे हा बोलायला, आपण सहज बोलतो जयहिंद, जे लोक जयहिंद बोलत नाहीत त्यांच्या विषयी काही बोलायचे नाही.परंतु जे जयहिंद बोलतात त्यांच्याशी थोडं हितगुज.
मित्रांनो जयहिंद या शब्दाची फोड केली तर जय आणि हिंद अशी होईल, म्हणजेच आपल्या देशाचा विजय आहे किंवा असो. आपण सर्वजण या देशाचे सुजाण नागरीक आहोत, ज्या मातृ-भूमीतआम्ही जन्म घेतला, आणि शिक्षणाला सुरवात केली तेव्हा पासूनच आपण प्रतिज्ञा घेतो कि भारत माझा देश आहे,या देशातील सारे भारतीय माझे बंधू आणि भगिनी आहेत आणि या देशावर माझे प्रेम आहे.
मित्रांनो ज्या देशात आपण राहतो तो देश आपलाच आहे, यात दुमत नाही, परंतु सारे भारतीय आपले बंधू आहेत भगिनी आहेत का ? हा प्रश्न आपण एकदा प्रामाणिक पणे स्वतःला विचारणे गरजेचे आहे. आज आपल्याला फक्त आपल्या सैनिक बांधवाच्या विषयीचं बोलायाचं आहे. आज आपण सगळेच सोशल माध्यमातून एक दुसऱ्यांशी सतत संपर्कात असतो. त्यामुळे देशाच्या सीमेवर आपले सैनिक बांधव कसे आहेत किंवा ते कशा प्रतिकूल परिस्तीथीशी सामना करत आपल्या देशाचे आणि आपले संरक्षण करत आहेत हे आपल्याला समजत असतं. अगदी तसेच जर शत्रूने हल्ला केला तर तो परतवण्यासाठी आपल्या जीवाची
बाजी लावून शत्रूशी लढता लढता प्रसंगी शहीद झालेल्या आपल्या बांधवांच्या बाबतीत देखील आपल्याला लगेच समजत असतं. अशी दुःखाची बातमी समजलीरे समजली की एक भारतीय नागरिक म्हणून आपण सगळे सर्वप्रथम काय करतो तर, सोशल माध्यमातून "भावपूर्ण श्रध्दांजली" हे दोन शब्द लिहिले आणि पुढे पाठवले की एक भारतीय नागरिक म्हणून आपल्या सैनिक बांधवा बद्दलची आपली जबाबदारीची बांधिलकी संपवतो.
मित्रांनो थोडा विचार करा, आपल्या या दोन शब्दात संपेल एवढचं त्या आपल्या सैनिकांच्या बलीदानाच योगदान आहे का ? तर नक्कीच नाही.मित्रांनो आपण सगळेच आप आपल्या क्षेत्रात, कामात व्यस्त आहात आणि असायला ही हवं कारण आपल्या कुटुंबाची जबाबदारी आपल्या खांद्यावर आहे, अगदी तसंच आपल्या देशाच्या रक्षणाच्या जबाबदारीसाठी खांद्यावर बंदूक घेऊन आपले सैनिक बांधव सीमेवर २४ तास अविरत पहारा देत आहेत म्हणून आपण इथे आपल्या कुटुंबा बरोबर आनंदात राहतो आहोत. परंतु या देश रक्षणा करता प्रसंगी शहिद झालेल्या आपल्या सैनिक बांधवाच्या;कुटुंबाच्या आनंदाच काय ? हा प्रश्न आपल्याला पडतो का ? आणि जर पडला तर आपण तो सोडवतो का ?
मित्रांनो नुकताच आनंदाचा दिवाळी सण संपला आपण प्रत्येकाने तो आपल्या कुटुंबाबरोबर मोठ्या आनंदाने साजरा केला, कुणी कुटुंबा बरोबर मित्र परिवाराबरोबर सहलींचा आनंद घेतला , कुणी सिनेमांचा आनंद घेतला, कुणी पै पाहुण्यांचा भेटीचा आनंद घेतला तर कुणी देव दर्शनाचा आनंद घेतला तर कुणी दिवाळी सुट्टीत आरामाचा आनंद घेतला. मित्रांनो याचं दिवाळी सणा दरम्यान
हिंदी चित्रपट सृष्टीतील सामाजिक भान असणारा कलाकार अक्षय कुमार याने आपल्या दिवाळीच्या सणाचा आनंद हा शहीद झालेल्या कुटुंबाना आर्थिक मदत देऊन साजरा केला. ही बातमी आपण सर्वांनी सोशल माध्यमातून एक दुसऱ्यांना पाठवली, परंतु पुढे पाठवण्याच्या अगोदर आपल्या मनात विचार आला का ? अरे अक्षय कुमार जर हे करतो आहे तर मग आपण देखील थोडा तरी खारीचा वाटा का बरं उचलू नये ?
परंतु तसं न होता ती बातमी सोशल माध्यमातून फक्त पुढे पाठवली, म्हणजे मी माझे देशप्रेम आणि देशभक्ती सिद्ध केली, आणि आपली आपल्या सैनिक बांधवाच्या कुटुंबाप्रती असलेली नैतिक आणि राष्ट्रीय जबाबदारी संपली. आहो अक्षय कुमार, नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे हि आणि असे अनेक लोकं हे आपल्या शहीद सैनीक कुटुंबासाठी, समाजासाठी, देशासाठी खूप काही करत आहेत,
त्यांनी केलेल्या देश भक्तीच्या, देश सेवेच्या बातम्या फक्त सोशल माध्यमातून पुढे पाठवताना आपल्याला देखील आपल्या सामाजिक जबाबदारीची,सामाजिक बांधिलकीची जाणीव व्हायला हवी नाही का ? वि. दा. करंदीकर यांचा एक सुंदर विचार इथे मुद्दाम सांगावासा वाटतो, देणाऱ्याने देतं जावे, घेणाऱ्याने घेतं जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. तर मित्रांनो चला आपण अक्षय कुमार, नाना पाटेकर यांचे आणि त्यांच्या सारख्या अनेक सामाजिक संस्थेचे जे सैनिकांसाठी जे कार्य चालू आहे त्याचा एक भाग होऊ या आणि आपलं राष्ट्रीय कर्तव्य पार पडू या.
मित्रांनो हा पत्र प्रपंच हा एवढ्याच साठी की हा देश, ही भारत भुमी माझी आहे आणि या भुमीच रक्षण करणारा माझा रक्ताचा नसला तरी माझा बांधव आहे,त्याचा त्याग हा देशासाठीचा सर्वोच्च त्याग आहे, त्याच्या पाठी मागे त्याच्या कुटुंबाची जबाबदारी माझी देखील आहे, याची जाणीव व्हायला हवी.तेव्हा मित्रांनो फक्त जयहिंद बोलून जमणार नाही, फक्त श्रध्दांजली वाहून जमणार नाही, तर या जयहिंद साठी लढणाऱ्या कुटुंबाच्यामागे खंभीर उभं राहिलं पाहिजे, हो ना ? आता ते कसं उभं राहायचं हे आपण ठरवायचं आहे.बाकी आपण ज्ञाते आणि सर्वश्रुत आहातच.
लक्षात ठेवा देहाकडून देवाकडे जाताना जो देश लागतो, ज्या देशात मी राहतो, ज्या देशाचं मी काहीतरी देणं लागतो, ज्या देशावर प्रेम आहे. त्या साठी नुसत जयहिंद बोलुन चालणार नाही तर आपल्या कृतीतुन पण दीसुन आले पाहीजे.
*जयहिंद*
*भारत माता कि जय*
New Law From 01Ju l3024
Tuesday, 18 October 2022
डॉ. पांडुरंग सदाशिव खानखोजे
Sunday, 6 February 2022
भारतरत्न लता_मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली
आपल्या मंजुळ स्वरांची मोहिनी टाकत अख्ख्या जगाला मंत्रमुग्ध करणाऱ्या गायिका आणि भारतरत्न पुरस्काराने सन्मानित #लता_मंगेशकर यांचे आज (६ फेब्रुवारी २०२२) वृद्धापकाळानं निधन झालं.
लता मंगेशकर यांचा अल्पपरिचय.
जन्म. २८ सप्टेंबर १९२९ इंदोर येथे.
लता मंगेशकर यांची गाणी म्हणजे रसिकांसाठी मोठी पर्वणीच होती. लता मंगेशकर, भारतीय चित्रपटसृष्टीतील पार्श्वगायनाच्या इतिहासातील एक सुवर्णपान. यांचा जन्म मध्य प्रदेशातील इंदूर येथील मराठी भाषिक गोमंतक कुटुंबात झाला. त्यांचे वडील पंडित दीनानाथ मंगेशकर हे शास्त्रीय गायक आणि नाट्य अभिनेते होते, त्यामुळे लताजींना संगीताचा वारसा लहानपणापासूनच मिळाला. त्यांना लहानपणी “हेमा” या नावाने हाक मारली जायची, पण दिनानाथ यांच्या नाटकातील 'लतिका' या पात्राच्या नावावरुन त्यांनी लता नाव ठेवल्याचे म्हटले जाते.
लता मंगेशकर यांनी वयाच्या १३ व्या वर्षी गायनात पाऊल ठेवले होते आणि १९४२ मध्ये त्यांनी पहिले गाणे रेकॉर्ड केले होते. लता मंगेशकर यांना त्यांच्या वडिलांकडून म्हणजेच पंडित दिनानाथ मंगेशकर यांच्याकडून गाण्याचा वारसा मिळाला होता. मीना खडीकर, आशा भोसले, उषा मंगेशकर आणि हृदयनाथ मंगेशकर या भावंडांमध्ये त्या सर्वात मोठ्या होत्या.
आपल्या वडिलांच्या मराठी संगीत नाटकात त्यांनी पाचव्या वर्षी काम सुरू केले.
वयाच्या १३ व्या त्यांनी किती हासाल या चित्रपटात नाचू या गडे खेळु सारी मनी हौस भारी हे गाणे म्हटले. मात्र त्याचा समावेश झाला नाही.१९४२ मध्ये पाहिती मंगळागौर या सिनेमात त्यांनी छोटीशी भूमिकाही केली आणि नटली चैत्राची नवलाई हे गाणेही गायले. गजाभाऊ या मराठी चित्रपतात माता एक सुपुत की दुनिया बदल दे तू हे पहिले हिंदी गीत गायले.
लता दीदी १९४३ मध्ये मुंबईत स्थायिक झाल्या. त्यांनी शास्त्रीय संगीताचे धडे गिरवण्यास भिंड बझार घराण्याचे उस्ताद अमन अली खान यांच्याकडे सुरवात केली. वसंत जोगळेकर यांच्या आपकी सेवा मे (१९४६) पा लागून कर जोरी हे गीत त्यांनी गायले. त्याला दत्ता डावजेकर यांनी संगीत दिले होते.१९४५ बडी माँ या चित्रपटात त्यांनी माता तेरे चारणोमे हरभजन म्हटले.
लता मंगेशकर यांना हिंदी चित्रपटसृष्टीत पहिला ब्रेक मिळाला तो आयेगा आने वाला या गाण्यासाठी हे गाण इतकं प्रसिद्ध झालं की त्यांच्याकडे गाण्यासाठी रांग लागली.आपल्या सात दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी विविध भाषांमध्ये ३० हजारांहून अधिक गाणी गायली. लता मंगेशकर यांनी ९८० पेक्षा अधिक हिंदी चित्रपटांची गाणी गायली होती व २० हून अधिक प्रादेशिक भारतीय भाषांमध्ये गायन केलं होते. 'एक प्यार का नगमा है', 'राम तेरी गंगा मैली', 'एक राधा एक मीरा' आणि 'दीदी तेरा देवर दीवाना' यांसारख्या लोकप्रिय गाण्यांमागे लता मंगेशकर यांनी आवाज दिला.
लता मंगेशकर यांना १९६९ मध्ये तिसरा-सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मभूषण, १९९९ मध्ये द्वितीय-सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मविभूषणने सन्मानित करण्यात आले. २००१ मध्ये त्यांच्या संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल भारत रत्न या सर्वोच नागरी पुरस्काराने सन्मानित केले एम एस सुब्बलक्ष्मी यांच्यांनंतर हा पुरस्कार पटकावणाऱ्या दुसऱ्या गायिका होत्या.त्यांना २००९ मध्ये ऑफिसर ऑफ द लीजन ऑफ ऑनर हा फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार देखील प्रदान करण्यात आला. तीन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, बंगाल चित्रपट पत्रकार पुरस्कार 15 वेला तर फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट गायिका पुरस्कार चार वेळा पटकावला. त्यांना फिल्मफेअर कडून दोनदा विशेष सन्मान करण्यात आला होता. १९९२ मध्ये महाराष्ट्र राज्य सरकारनं लता मंगेशकर यांच्या नावाने लता मंगेशकर पुरस्कार नावानेही पुरस्काराचीही सुरुवात केली. तर मध्य प्रदेश सरकरानंही १९८४ सालापासून लता मंगेशकर पुरस्कार देण्याची परंपरा सुरू केली. जी अविरत सुरू आहे. तसेच त्यांना १९८९ मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार देखील प्रदान करण्यात आला होता.आकाशात देव आहे का असं कुणी विचारलं तर देवाचं माहित नाही. पण आकाशात सुर्य आहे, चंद्र आहे आणि लताचा स्वर आहे!. दिवस-रात्र अशी कुठलीही वेळ नाही किंवा क्षण नाही की लताचा स्वर या जगात कुठून तरी कुठेतरी जात येत असतो, अशा शब्दांत पु.ल.देशपांडे यांनी लतादीदींच्या महतीचं वर्णन केलं होतं.
लता मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
The Foreign Contribution (Regulation) Amendment Bill
The Foreign Contribution (Regulation) Amendment Bill, 2026 introduces stricter government control over how non-governmental organizations (N...
-
प्रत्येक गोष्टीसाठी सतत दुसऱ्यावर दोषारोप करण्याचा जणू आपल्याला असाध्य रोगच जडला आहे. कुणीतरी आपल्याला मदत करावी, आपला भार हलका करावा अशी इच...
-
Indian Government Jobs - www.indgovtjobs.in HSSC Recruitment 2016 Apply Online (2509 Vacancies) 10th 12th Pass Govt Jobs 2016 (4...
-
मित्रांनो मी ब्रिगेडियर अनिल तळवलकर (निवृत्त) सेना मेडल यांचे परमवीर चक्र विजेत्यांच्या शौर्यकथा हे पुस्तक वाचले त्यात त्यांनी परमवीर चक्र व...