Monday 28 December 2015

दुःखद निधन

सर्व माजी सैनिक बंधुना कळविताना अत्यंत दुःख होत आहे की  आपल्या वर्धा नगरीतिल शुर पुत्र शिरिन ढानेवार हे सिमा सुरक्षा बल या दलात 13 वर्षा पासून कार्यरत होते असून सध्या ते नेपाल सीमेवर आपले कर्त्तव कार्यरत असताना अचानक हॄदय् विकराने  . दी.26/12/2015 रोजी अंत झ्ाला . तरी त्यांचे अंत्य विधि शा सकिय पद्धतीने आज दी 28/12/2015 रोजी सकाळी 10 वाजता करण्यात येत आहे तरी आपली सर्वांची उपस्थीति अर्विनाका वर्धा येथे प्रार्थनीय आहे. धन्यवाद्।

सचिव
भारतीय माजी सैनिक संघ वर्धा
बिपिन मोघे

Saturday 26 December 2015

'नो व्हीकल्स डे'

सर्वत्र प्रदूषणाची बिकट समस्या निर्माण झालेली आहे याची सुरुवात स्वतःपासुन केल्यास आपण आपल्या कुटुंबाला, समाजाला आणि देशाला कही प्रमाणात का होईना यापासून वाचवु शकु, अशी खूणगाठ मनाशी बाळगून वर्धेकरानी 'लोकमत इनिशिएटिव'ला ओ देत आज दी 24/12/2015  पासून वर्धेत 'नो व्हीकल्स डे' पळण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला. याप्रसंगी खासदार रामदासजी तडस प्रामुख्याने उपस्थित होते. यात भारतीय मजिसैनिक संघ वर्धा चे अध्यक्ष श्री शाम परसोडकर, उपाध्यक्ष श्री अरुण हस्ती, उपाध्यक्ष श्री बाबाराव नागपुरे, सचिव श्री बिपिन मोघे, श्री भास्कर दाढ़ें, श्री शरद भालकर, सह शहरातील 32 सामाजिक संघटनाही या साठी सरसवल्या सर्वानी नियोजनबद्ध पद्धतीने अमलबजावणी केली. यात आम्ही वर्धेकर चे संजय इंगळे तिगावकार ,वैद्यकीय जनजागृति मंचचे डॉ.सचिन पावड़े, यांनी पुढाकार घेत वर्धा लोकमत कार्यालय ठाकरे मार्केट ते बजाज चौक,ते ग़ांधी पुतळ्या पर्यन्त साईकल मार्च काढण्यात आला.
             बिपिन मोघे
भारतीय माजी सैनिक संघ वर्धा
 
 

 
No_Vehicles_Day_Vardha (1)
No_Vehicles_Day_Vardha (2)
No_Vehicles_Day_Vardha (3)
No_Vehicles_Day_Vardha (4)
No_Vehicles_Day_Vardha (5)
No_Vehicles_Day_Vardha (6)

Friday 25 December 2015

Welcome


परमवीर चक्र विजेत्यांच्या शौर्यकथा

मित्रांनो मी ब्रिगेडियर अनिल तळवलकर (निवृत्त) सेना मेडल यांचे परमवीर चक्र विजेत्यांच्या शौर्यकथा हे पुस्तक वाचले त्यात त्यांनी परमवीर चक्र विजेत्यांच्या विरकथा शालेय अभ्यास क्रमात नाही. आणि शाळा संपल्यानंतर बहुसंख्य नागरिकांचा  इतिहासाशी संबंध येतच नहीं. त्यामुळे आपल्या सैन्यतील वीरानी केलेल्या अतुलनीय कामगिरी बद्दल आपल्या समाजाला काहीच माहिती नहीं. आपल्या समाजातील ही त्रुटि अंशात: का होईना दूर करने गरजेचे आहे. असे त्यांच्या मनोगतात लिहिले. आणि हे खरोखर सत्य आहे.

         यासाठी आपणाला एकत्रित येऊन हे कार्य करावे लागेल त्या साठी प्रत्येक शाळेत जाऊन विरांची विरगाता शाळकरी मुलांना समजवावि लागेल. त्यामुळे स्वतंत्रयप्राप्तिनंतरचा इतिहास या देशातील नविन पिढीच्या मनात घर करुन जाईल तेव्हा आपन खरे सैनिक आहो. आपन देशासाठी काय केले , हे या जगाला कळेल आणि यामुळे परमवीर चक्र विजेता लान्स नायक करम सिंग सारख्या वीर योध्याला ,त्याच्या कुटुंबाला न्याय मिळेल.

       मित्रांनो आपल्या देशात शोकांतिका आशी परमवीर चक्र विजेता लान्स नायक करम सिंग या महान योध्याच्या घरीची स्तिथि अतिशय बिकट आहे. त्यामुळे त्यांच्या 21 वर्ष्याच्या सतनामसिंग या नतवाने त्यांना मिळालेल्या भारताच्या सर्वोच्च शोर्यपदकाचा लिलाव करण्याचे ठरविले आहे. कारण मागील 50 वर्ष, पंजाब सरकार, तसेच केंद्र सरकारने परमवीर चक्र विजेत्या ना लागु असलेले उदाहरणार्थ पेट्रोल पंप, जमीन व इतर फायदे त्यांना दिले नाहीत. ही दुःखाचीच गोष्ट नव्हे तर पूर्ण देशाला काळीमा फासणारी गोष्ट आहे. तसेच हे उदाहरण कही एका सैनिकाच्या बबतीतील नहीं तर कितीतरी सैनिकाना आपल्या देशातील एकाच खुर्चीवर बसून पूर्ण जीवन व्यतीत करणाऱ्या बाबू लोकांनी खोटी नाटी नियम व कारणे दाखवून, त्यांनी अतिशय काष्ठाने मिळविलेल्या सोयी सुविधा नकरलेल्या आहेत.

   जय हिन्द ।

बिपिन मोघे
सचिव       
भारतीय माजी सैनिक संघ वर्धा

डॉ. पांडुरंग सदाशिव खानखोजे

स्मरण : एक प्रेरणादायी प्रवास डॉ. पांडुरंग सदाशिव खानखोजे यांचे सारे आयुष्यच विस्मयकारी घटनांनी भरलेले आहे. गदर क्रांतीचे प्रणेत...