Saturday 27 November 2021

 26/11 हुतात्म्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

     श्रद्धांजली वाहून गप्प बसने चालनार नाही. देशासाठी, आपल्या प्रत्येकासाठी या हुतात्मा पोलिस, सैनिक व जवान यांनी प्राण त्यागले आहेत. आपली नैतिक जबाबदारी ओळखून जाती धर्माच्या चौकटिच्या बाहेर पडून विचार करून आपल्याला या सैनिक, पोलिस व देशासाठी काय करता येईल ते पहाणे गरजेचे आहे. आम्ही जयहिंद फाऊंडेशनच्या माध्यमातून सैनिक, पोलिस व समाजासाठी अतुलनीय साहस दाखवतात त्यांच्या साठी कार्य करत असताना माझ्या प्रत्येक देश बांधवाला देशाचे या समाजाचे आपण देने लागतो, व म्हणून मी माझा जो पण जात धर्म आहे त्याचे पालण मी माझ्या घरात करेन पण जेव्हा मी घराचा उंबरा ओलांडून बाहेर पडेन त्यावेळी भान ठेवेन कि मी या महान देशाचा  महान व जबाबदार नागरिक आहे. मी अशी कोणतीही कृती करनार नाही कि जेणे करून माझ्या देशाला व देशवासीयांना हाणीकारक ठरेल.....

          देशासाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्मा जवानाला वाटले पाहिजे कि हे माझे  देश बांधव आहेत, व यांच्यासाठी मी बलिदान देऊन चूक केली नाही हि भावना महत्वाची समजून प्रत्येकाने कार्य करणे गरजेचे आहे.  

                श्री बिपीन मोघे

        राष्ट्रीय संचालक-जयहिंद फाऊंडेशन


डॉ. पांडुरंग सदाशिव खानखोजे

स्मरण : एक प्रेरणादायी प्रवास डॉ. पांडुरंग सदाशिव खानखोजे यांचे सारे आयुष्यच विस्मयकारी घटनांनी भरलेले आहे. गदर क्रांतीचे प्रणेत...