Tuesday 19 February 2019

श्रद्धांजली

सुधा_मूर्ती_यांचा निशब्द करणारा एक लेख....
*नक्की वाचा, नक्कीच  काही तरी नवीन शिकायला मिळेल.*

त्या रशिया मध्ये असताना एका पार्क मध्ये फिरायला गेल्या होत्या. रविवार.. त्यात थोडा पाऊस आणि थंडी.. नुकतेच लग्न झालेले एक जोडपे तिथे फोटो काढून घेत होते. ब्लाँड, घाऱ्या निळ्या डोळ्यांची पंचविशीतली सुंदर मुलगी आणि तिच्याच वयाचा तितकाच हँडसम मुलगा.. मुलीने अतिशय देखणा व्हाइट वेडिंग गाऊन घातला होता पण मुलाने मात्र मिलिटरी युनिफॉर्म..

त्यांचे फोटो काढून झाल्यावर तिथेच असलेल्या वॉर मेमोरिअल पाशी ते गेले आणि हातातला बुके तिथे ठेऊन दोघांनी मान झुकवून वंदन केले. हे सगळे पहात असलेल्या सुधा मूर्तींच्या मनात अनेक प्रश्नांनी गर्दी केली होती.. तितक्यात तिथेच बाजूला उभ्या असलेल्या एका वयस्कर माणसाने त्यांची साडी पाहून विचारले "तुम्ही भारतिय का?" हो असे उत्तर देऊन त्यांच्या गप्पांना सुरुवात झाली. त्या माणसाने परदेशात काम केले असल्याने इंग्लिश मध्ये बोलणे सोप्पे झाले. जरा उत्सुकतेने मूर्तींनी विचारले हे दोघे इथे येऊन नमस्कार का करून गेले? त्यावर त्या माणसाने सांगितले "रशिया मधे लग्न झाल्यावर त्या जोडप्याने कोणत्याही एका राष्ट्रीय स्मारकाला भेट द्यायची पद्धत आहे. नवरा मुलगा लग्नात केवळ मिलिटरी युनिफॉर्मच घालतो. प्रत्येक तरुण मुलाला (समाजातील सगळया स्तरातल्या) काही वर्षे आर्मी जॉईन करावी लागते. तरुण पिढीला हे लक्षात राहावे की आपल्या आधीच्या पिढीने त्यांचे आयुष्य देशासाठी अर्पण केले, रशियने अनेक लढाया लढल्या, त्यातल्या काही जिंकल्या, काही हरल्या पण जे युद्धात मारले गेले त्यांचा त्याग विसरला गेला नाही पाहिजे. नवीन लग्न झालेल्या जोडप्यांच्या हे कायम लक्षात राहिले पाहिजे की ते ज्या स्वतंत्र, शांततापूर्ण रशिया मध्ये रहात आहेत ही या युद्धात शहीद झालेल्यांची देण आहे. आणि त्यांनी त्यांच्या आयुष्यातल्या सगळ्यात आनंदाच्या क्षणी या शहिदांना विसरता कामा नये.. त्यांच्या पुढच्या पिढीला सुद्धा याची जाणीव त्यांनी करून दिली पाहिजे.. देशाप्रती प्रेम हे लग्नाच्या सेलिब्रेशन पेक्षा जास्त महत्त्वाचे आहे.. "

किती मोठा विचार आहे हा.. आपल्या डोक्यात का नाही येत या गोष्टी?? का नाही थोडीही कृतज्ञता दाखवत आपण आपल्या जवानां साठी?? का आपल्या विचारांमधे, कृतींमध्ये यांचे समर्पण नसते?? भारत इंग्रजांच्या तावडीतून स्वतंत्र झाला हे सोडून आणि इतिहासातले धडे सोडले तर आजच्या नवीन पिढीला किती क्रांतिकारकांची नावे माहित आहेत?? आपल्या पाल्याला हे सगळे माहित पाहिजे, त्याच्या मनात देशाविषयी, आपल्या सैन्याविषयी प्रेम, आदर हा असलाच पाहिजे आणि त्यासाठी पोषक वातावरण देणे ही किती पालकांना त्यांची जबाबदारी वाटते?? किती शाळांमध्ये इतिहास हा नवीन  सक्षम पिढी घडवण्यासाठी शिकवला जातो??

सीमेवर हल्ले तर होतच राहतात, आपले जवान शहीद होतच राहतात म्हणून आपण सोयीस्कर पणे दुर्लक्ष करत रहाणार.. चर्चा, महाचर्चा घडत रहाणार, अपोझिशन वाले आणि सत्तेत असणारे एसी ऑफिस मध्ये बसून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यातच धन्यता मानणार, शहिदांच्या कुटुंबीयांना निधी जाहीर होणार, दोन चार नेते त्यांना भेटणार त्याचे फोटो पेपर मध्ये छापुन येणार आणि आपण चोवीस तासांच्या आत सगळे विसरून जाणार..

सो कॉल्ड वॅलेंटांईंस डे साजरा करून झाल्यावर आता आजही शहीद झालेल्या आपल्या जवानांना कोरडी श्रद्धांजली वाहण्यापलिकडे आपण करणार तरी काय आहोत अजून..??!!

।।जयहिंद।।

डॉ. पांडुरंग सदाशिव खानखोजे

स्मरण : एक प्रेरणादायी प्रवास डॉ. पांडुरंग सदाशिव खानखोजे यांचे सारे आयुष्यच विस्मयकारी घटनांनी भरलेले आहे. गदर क्रांतीचे प्रणेत...